मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट

July 30, 2012 2:47 PM0 commentsViews: 2

30 जुलै

पावसाळा अर्धा संपत आला तरी पाऊस नसल्यानं मराठवाडा दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या चार जिल्हयातली परिस्थिती अतिशय गंभीर झालीय. तर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्हयात सर्व पिकंच धोक्यात आली आहेत. या आठही जिल्हयांत पाण्याचा गंभीर प्रश्न झालाय. सध्या मराठवाडयातल्या आठही मोठया धरणामध्ये पाणीसाठाच शिल्लक नाही. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरणी केलेल्या शेतकर्‍यांच्या पेरण्या आता वाया जाण्याची भिती आहे. जनावराचा चारा, आणि पाणीटंचाईमुळे मराठवाडयाला मोठया दुष्काळाचा सामना करण्याची वेळ सुरु झाली आहे. दरम्यान, खरीप हंगाम धोक्यात आल्याने आता रब्बीची तयारी लवकर सुरू करा, असं पत्र केंद्रानं राज्य सरकारला पाठवलंय.

close