राज्यातील चार सेझ प्रकल्प रद्द

July 30, 2012 4:58 PM0 commentsViews: 20

30 जुलै

राज्यात खासगी विकासांसोबतचे सेझ (SEZ)चे चार प्रकल्प सरकारनं रद्द केले आहे. या चारही प्रलकल्पांना स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे हे प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये रायगडमधला इंडियाबुल्सचा 1936 हेक्टरचा प्रकल्प, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा 3000 हेक्टर, व्हिडिओकॉनचा औरंगाबादमधला 2763 हेक्टर, व्हिडिओकॉनचा पुण्याजवळचा 1000 हेक्टरचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.आज MIDC च्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री नारायण राणेनी हा निर्णय जाहीर केला. या चारही एसईझेड प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध होता. इंडियाबुल्स कंपनीचा राजनखार रायगड इथला 1936 हेक्टरचा प्रकल्प 2008 मध्ये प्रस्ताव आला होता. कार्ला मल्टीपल एसईझेड हा महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा 3000 हेक्टरचा प्रकल्प होता. गांधेली औरंगाबाद इथे व्हिडिओकॉन मल्टी पर्पज एसईझेड हा 2763 हेक्टरचा प्रकल्प होता तर पुण्याजवळच्या वाघोली जवळचा व्हिडिओकॉन कंपनीचा 1000 हेक्टरचा प्रकल्पाचा प्रस्ताव होता. या चारही एसईझेड प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध होता. आज एमआयडीसीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री नारायण राणेनी हा निर्णय जाहीर केला.

close