तामिळनाडू एक्स्प्रेसला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

July 30, 2012 9:18 AM0 commentsViews: 33

30 जुलै

तामीळनाडू एक्प्रेसला आज सकाळी अपघात झाला. बोगीला आग लागल्यानं 30 प्रवाशी ठार झाले आहे. तर 25 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. आंध्रप्रदेशमधील नेल्लोरजवळ जात असताना नवी दिल्ली – तामीळनाडू एक्प्रेसच्या एस-11 या बोगीत अचानक आग लागली. आगीनंतर तातडीनं मदत कार्याला सुरुवात झाली. या आगीत एस -11 बोगी संपुर्णपणे जळून खाक झाली आहे.

close