बिल्डराचा ‘हवा महल’ जमिनीवर, 800 कोटींचा घोटाळा ?

July 30, 2012 4:56 PM0 commentsViews: 16

सुधाकर काश्यप, मुंबई

30 जुलै

मुंबईत सध्या रिअल इस्टेटची बुम आहे. या धंद्यात प्रचंड फायदा होत असल्याने अनेक व्यक्ती इतर धंदे सोडून या धंद्यात पडत आहेत. यावेळी लोकांची तर फसवणूक तर होतेच शिवाय बिल्डर रहिवाशांच्या जीवावर हवा महल बांधत असतात. न्यू डी.एन.नगर सोसायटीनं वैदेही आकाश प्रायव्हेट लिमिटेडचे मालक गुरुनाथ फोंडेकर यांचं टेंडर मंजूर केलं. पण ते 'हवा महल' बांधणारे निघाले. त्यांनी 480 पैकी एकही घर बांधलेलं नाही. उलट प्रत्यक्ष उपलब्ध एफएसआय पेक्षा किती तरी अधिक एफएसआय हवा महल करुन विकल्याचं समोर येतंय. त्यांनी सुमारे 800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रहिवासी करत आहे.

न्यू डी.एन.नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज युनियन या संस्थेच्या 8 इमारती या सिटी सर्वे नंबर 106(5) या नंबरनं 20 हजार 388 चौरस मीटर म्हणजेच साडेपाच एकर जागेवर उभ्या होत्या. याठिकाणी इमारतीच्या आजूबाजूला मोकळी जागा होती. या जागेसाठी वैदेही आकाश प्रायव्हेट लिमिटेडबरोबर रहिवाशांचा 31 डिसेंबर 2005 ला करार झाला. काही महिन्यात ब्लास्टिंग करुन या इमारती पाडण्यात आल्या. या जागेवर इमारती उभारण्यासाठी वैदेहीचे मालक बिल्डर गुरुनाथ फोंडेकरला म्हाडाच्या नियमानुसार 2.4 एफएसआय मिळणार होता. एकूण 5 लाख 24 हजार 696 स्क्वेअर फूट इतकी जागा बांधकामासाठी उपलब्ध झाली. त्यातली 2 लाख 71 हजार 54 स्क्वेअर फूट जागा रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी वापरली जाणार होती. तर 2 लाख 53 हजार 632 स्क्वेअर फूट जागा बिल्डरला विक्रीसाठी उपलब्ध होती.

- मिळणारा एफएसआय – 2.4 – एकूण 5 लाख 24 हजार 696 स्क्वेअर फूट मिळणार होता.- 2 लाख 71 हजार 54 इतका स्क्वेअर फूट जागा रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी वापरली जाणार- तर 2 लाख 53 हजार 632 स्क्वेअर फूट जागा बिल्डरला विक्रीसाठी उपलब्ध

रहिवासी भूषण सारंग म्हणतात, फोंडेकर याला प्रचंड फायदा होणार होता. पण त्यांनी बांधकाम करायच्या ऐवजी त्यांच्या वाट्याचा एफएसआय रुस्तमजी यांना 4 एप्रिल 2007 रोजी 112 कोटी रुपयांना विकला. एवढंच नव्हे तर त्याला 57 हजार स्केअर फूट रुस्तमजी त्यांना देणार आहेत.

व्यवहारातील 70 कोटी रुपये बिल्डर फोंडेकर यांनी घेतलेही…पण रहिवाशांच्या इमारतीचं बांधकाम काही त्यानं सुरु केलं नाही. साडेतीन वर्षांनंतर बिल्डर फोंडेकरनं रहिवाशांकडे रुस्तमजी यांच्याबरोबर त्याचा झालेला व्यवहार कायम करण्यासाठी सोसायटीची परवानगी मागितली. यावेळी रहिवाशांनी त्याला काही अटी घातल्या. – रुस्तमजी यांनी उरलेले व्यवहाराचे 42 कोटी रुपये सोसायटीच्या परवानगीशिवाय फोडेंकरला द्यायचे नाहीत- उर्वरीत 57 हजार स्केअर फूट जागा फोंडेकर याला द्यायची नाही- त्या शिवाय रुस्तमजी यांनीसुद्धा त्यांची 50 हजार स्केअर फूट जागेचा ताबा विकत घेणार्‍याला द्यायचा नाहीहे झाल्यानंतर रुस्तमजींनी जेव्हा व्यवहाराबाबत पेपरमध्ये जाहिरात दिली त्यांनतर धक्कादायक प्रकार उघडकीला आला.

त्याबाबत अनेक जण कोर्टात गेले. यावेळी बिल्डर फोंडेकर यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय… त्यात ते स्वतःच आपण, – सतारा ग्रुप या कंपनीला 2 लाख स्केअर फूट तर – क्राऊन ऐश्वर्या या कंपनीला 2 लाख स्केअर फूट जागा दिल्याच म्हणतात- त्याचप्रमाणे महावीर डेव्हल्पर्स या कंपनीबरोबर पार्टनरशिपने 2 लाख स्केअर फूट जागेचं बांधकाम करत असल्याचं म्हटलंय फोंडेकर यांच्याकडे सोसायटीच्या पुर्नवसनाच्या बदल्यात 2 लाख 53 हजार स्केअर फुट जागा होती. ती त्यांनी आधीच रुस्तमजी यांना विकली. मग इतरांना नसलेला एफएसआय विकून त्यांनी त्यांची फसवणूक केल्याचं स्पष्ट होतंय. फोंडेकर यांनी सुमारे 800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप सोसायटीचे वकील आप्पासाहेब देसाई यांनी केलाय. बिल्डर फोंडेकर यांनी त्यांच्याकडे नसलेला सुमारे सहा लाख एफएसआय विकला. बिल्डरांच्या भाषेत याला हवा महल म्हणतात.

close