बॉक्सिंगमध्ये सुमीतचा धक्कादायक पराभव

July 30, 2012 5:03 PM0 commentsViews: 1

30 जुलै

बॉक्सिंगमध्ये भारताचा 19 वर्षाच्या सुमीत सांगवानला 81 किलो वजनी गटात प्राथमिक फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. ब्राझिलच्या फॅल्कोनं सुमीत सांगवानचा 15-14 असा निसटता पराभव केला. या मॅचमध्ये काही निर्णय सुमीतच्या विरोधात गेले. आणि यावरुना आता वादाला सुरुवात झाली आहे. कॉमेंटेटर्सच्या मतेही आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये खेळताना सुमीतनं संपूर्ण बाऊटमध्ये वर्चस्व राखलं होतं. पण सुमीतला हवे तसे गुण मात्र मिळू शकले नाहीत. या निर्णयावर केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनीही तात्काळ निषेध नोंदवला आहे.

close