‘तरुण भारत’च्या संपादकांनी व्यक्त केली दिलगिरी

July 30, 2012 9:42 AM0 commentsViews: 26

30 जुलै

तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांनी कर्नाटक विधानसभेसमोर दिलगिरी व्यक्त केली. बेळगावचे भाजपचे आमदार अभय पाटील आणि शाम घाटगे यांच्या कथित भ्रष्टाचारविरुद्ध तरुण भारतने बातम्या छापल्या. त्यानंतर पाटील आणि घाटगेंनी कर्नाटक विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता.

कर्नाटकाच्या विधासभेतला हा गोंधळ नेहमीचा नाही. कधी नव्हे ते.. सर्व पक्षांचे आमदार एकत्र येऊन गदारोळ करत होते. निमित्त होतं बेळगावातल्या तरूण भारत या मराठी वृत्तपत्राचं. बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई सुरू असताना. सर्वपक्षीय त्यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव आणत होते. मी माफी मागणार नाही असं आधी म्हणणार्‍या किरण ठाकूरांनी अखेरीस तरूण भारतच्या बातम्यांसाठी खेद व्यक्त केला.तर बेळगावात सर्व मराठी संघटना एकत्र आल्या. आणि त्यांनी कर्नाटक सरकारविरोधात निषेध मोर्चा काढला. तरूण भारतच्या छपाईवर घातलेली बंदी आणि ठाकूरांवरचा हक्कभंग ठराव यामुळे बेळगावचे मराठी भाषिक संतापले आहे.

हायकोर्टाचा आदेश डावलून दुसर्‍यांदा बरखास्त केलेली बेळगाव महापालिका. आणि आता तरूण भारतवर केलेली कारवाई.. या घटनांमुळे.. अनेक वर्षांनंतर.. सर्व मराठी संघटना एकत्र आल्या आहेत.

close