दारुबंदी करण्यार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या

July 30, 2012 9:49 AM0 commentsViews: 4

30 जुलै

अमरावतीमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याचा अवैध दारु विक्री करणार्‍या व्यक्तीनं खून केल्याची घटना घडली आहे. आक्रमण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश खंडारे हे दारुबंदीसाठी प्रयत्न करत होते. 26 जुलै रोजी त्यांच्यावर अवैध दारुविक्री करणार्‍यांनी तलवारीनं हल्ला केला होता. या हल्ल्यात खंडारे हे जखमी झाले होते. शेवटी काल उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मारेकर्‍यांना अटक करेपर्यंत खंडारे यांचा मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका खंडारेंचे नातेवाईक आणि आक्रमण संघटनेनं घेतली आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये तणावाचं वातावरण आहे. आक्रमण संघटनेच्या 35 कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक केली आहे.

close