गुजरात दंगलीप्रकरणी 22 जण दोषी

July 30, 2012 5:21 PM0 commentsViews: 6

30 जुलै

गुजरातमध्ये गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या दंगलीप्रकरणी 22 जणांना दोषी धरण्यात आलंय. यातल्या 21 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एकाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. या खटल्यात 61 जणांची निर्दोष सुटका करण्यात आलीय. त्यात भाजपचे माजी आमदार प्रल्हाद गोसा यांचा समावेश आहे. त्यांना संशयाचा फायदा घेत निर्दोष ठरवण्यात आलं. मेहसाना जिल्ह्यात दिपडा दारवाजामध्ये एकाच कुटुंबातल्या 11 जणांची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी कोर्टाने हा निकाल दिला आहे.

close