स्कूल बस आणि बेस्ट बसची धडक, 13 विद्यार्थी जखमी

July 30, 2012 10:05 AM0 commentsViews: 7

30 जुलै

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या स्कूल बस आणि बेस्टची समोरासमोर धडक झाल्याने 13 विद्यार्थी जखमी झाले आहे. 9 ते 12 वयागटाचे हे विद्यार्थी आहे. ऐरोली येथील युरो स्कुलची ही बस होती. या अपघातात 13 विद्यार्थ्यांसह एक शिक्षिका किरकोळ जखमी झाली आहे. 10 विद्यार्थ्यांसह शिक्षिकेवर नाहूरच्या फॉर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी बेस्टच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

close