ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा बाहेर

July 30, 2012 10:28 AM0 commentsViews: 7

30 जुलै

मागिल ऑलिम्पिकमध्ये एकमेव गोल्ड मेडल मिळवून देणार अचूक नेमबाज अभिनव बिंद्राचा यंदा निशाना चुकला आहे. 10 मीटर एअर रायफल पात्र फेरीत् बिंद्राला पार करता आली नाही. त्यामुळे दुर्देवाने बिंद्रा ऑलिम्पिकच्या बाहेर पडला आहे.10 मीटर एअर रायफल प्रकारात बीजिंग ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता आणि डिफेंण्डिंग चॅम्पियन अभिनव बिंद्रा पात्रता फेरीतच आऊट झाला. अभिनवला फक्त 594 पाईंट्स कमाई करता आली. पात्रता फेरीत अभिनवची सुरुवातच चागंली झाली नाही. पहिल्या दोन राऊंडमध्ये अभिनवनं प्रत्येकी 99 पॉईंटची नोंद केली. पण यानंतर पुढच्या राऊंडमध्ये चांगली कामगिरी करत त्यानं आघाडी घेण्याचा प्रयत्न केला पण यात तो यशस्वी ठरला नाही.

close