केंद्रीय टीम उद्यापासून करणार दुष्काळी भागाची पाहणी

July 31, 2012 10:06 AM0 commentsViews: 6

31 जुलै

पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. केंद्र सरकारनं दुष्काळाची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली टीम उद्यापासून 4 दुष्काळी राज्यांचा दौरा करणार आहे. 10 ते 12 सदस्यांची ही टीम असेल. यात कृषी सचिव, पशुसंवर्धन सचिव आणि ग्रामीण विकास विभागाच्या सचिवांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांच्या तीन दिवसात दौरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात दुष्काळाचा सर्वाधिका फटका बसलाय तो मराठवाड्याला. औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या चार जिल्हयातली परिस्थिती अतिशय गंभीर झालीय. तर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्हयात सर्व पिकंच धोक्यात आली आहेत. या आठही जिल्हयांत पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. सध्या मराठवाडयातल्या आठही मोठया धरणामध्ये पाणीसाठाच शिल्लक नाही.

close