दहशतवाद्यांकडे मिळाली घातक शस्त्रं

November 27, 2008 9:10 AM0 commentsViews: 2

27 नोव्हेंबर, मुंबईदक्षिण मुंबईत काल झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्याकडून अत्यंत घातक शस्त्रं मिळाली आहेत. हेक्लर अँड कोच या कंपनीची जर्मन बनावटीची एमपी फाइव्ह गटातली ही शस्त्रं आहेत. एके फोर्टी फोर्टी सेवन आणि एके फिफ्टी सिक्स पेक्षाही ही शस्त्र घातक आहेत. काँक्रिटलाही भेदण्याची या शस्त्रांची क्षमता आहे. त्यांच्याकडे फ्युजन गटातले आधुनिक हँड ग्रेनेड्सही असून क्लीप काढल्यावर फक्त हवेतलं ऑक्सिजन आणि तापमानामुळे या ग्रेनेड्सचा स्फोट होतो. पाकिस्तानी ऑर्डिनन्स फॅक्टरीचा स्टॅम्प या शस्त्रांवर आहे. बुधवारी रात्री झालेल्या चकमकीत एटीएसचे प्रमुख हेमंत करकरेंसह 11 पोलीस शहीद झाले होते. मुंबई पोलिसांकडे असलेल्या शस्त्रांपेक्षा ही शस्त्रं कित्येक पटींनी घातक आहेत. आपल्याकडे असलेली बुलेटप्रुफ जॅकेट्स या शस्त्रांचा सामना करण्यास सक्षम नव्हती. म्हणून मृत पोलिसांचा आकडा वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

close