शरद पवारांच्या घरासमोर अण्णा समर्थकांची निदर्शनं

July 30, 2012 10:56 AM0 commentsViews: 2

30 जुलै

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसलेले आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्यामुळे अण्णांचे समर्थक आक्रमक होत चाललेले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरासमोर आंदोलन केल्यानंतर आज कृषीमंत्री शरद पवार यांच्या घरासमोर अण्णा समर्थकांनी निदर्शन केली. तांदूळ आणि कणकेची पॉकेट्स फेकून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. काल रविवारी सोनिया गांधी आणि पी.चिदंबरम यांच्या घरासमोर अण्णा समर्थकांनी निदर्शन केली होती. आज पवारांना टार्गेट केलंय. आज संध्याकाळी काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शन करणार असल्याची शक्यता आहे.

close