परभणीमध्ये एसटी बस पुलावरुन कोसळली,एक ठार

July 31, 2012 10:11 AM0 commentsViews: 1

31 जुलै

परभणीमध्ये येलदरी नदीवरील पुलावरुन एक एसटी बस खाली कोसळून अपघात जालाय. या या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर 25 जण जखमी झाले आहेत. उटी या गावावरुन जिंतूरला येणारी ही बस 30 फूट उंचीवरुन नाल्यात कोसळली. नाल्यात जवळपास 6 फूट पाण्यात ही बस गेली. सकाळी 7 ला अचानक घडलेल्या अपघातानं आतील प्रवासी जखमी झाले यातील एकाच्या डोक्यास मार लागल्यानं तो जागीच ठार झाला.या बसचं समोरील टायर फुटल्यानं चालकाचा बसवरचा ताबा सुटला. यामुळे हा अपघात घडल्याचं समजतंय. या भागातील स्थानिक मच्छीमारांनी तातडीने मदत केल्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. जखमी प्रवाशांना जिंतूर इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

close