बाळासाहेबांना 2 दिवसांनंतर डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

July 30, 2012 12:52 PM0 commentsViews: 2

30 जुलै

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसात त्यांना कधी डिसार्ज मिळेल हे स्पष्ट होईल. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलिल परकार यांनी ही माहिती दिली. बाळासाहेबांवर आज होणारी एन्डोस्कोपी बुधवारी होणार असल्याचं कळतंय या एन्डोस्कोपीनंतर डिस्चार्ज बाबत ठरवता येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज लिलावतीला भेट दिली आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. दोन तास उद्धव ठाकरे हे लिलावतीमध्ये होते.

close