आपल्या जीवाला सरकारकडून धोका – केजरीवाल

August 1, 2012 10:22 AM0 commentsViews: 2

01 ऑगस्ट

हॉस्पिटलमध्ये दाखल करुन आपली जीव घेण्याचा सरकारचा डाव आहे याअगोदरही अशा जनआंदोलनात कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं आणि त्यांचं काही दिवसांनी मृत्यू झाला. मला सरकारवर बिल्कुल विश्वास नाही मला उपोषणापेक्षा सरकारची जास्त भीती आहे असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला. तसेच सरकारने जर जबरदस्ती केली तर आपण उपोषण सोडणार नाही असा इशारा अण्णांनीही दिला आहे. टीम अण्णांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. तर अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांची प्रकृती खालावली आहे. पण केजरीवाल यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. तसेच सरकारी डॉक्टरांची सेवासुविधाही नाकारली आहे. रोज तपासणी येण्यासाठी येणार्‍या सरकारी डॉक्टर्सना आता आम्ही माहिती देणार नाही असंही केजरीवाल यांनी म्हंटलंय.

close