नागपुरात शासकीय आयुर्वेदिक कॉलेजमध्ये रॅगिंग

July 31, 2012 12:36 PM0 commentsViews: 3

31 जुलै

नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक कॉलेज च्या वस्तीगृहात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. विशाल माळी या बीएएमएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला त्याच कॉलेजच्या सिनियर्स ने रॅगिंग करत मारहाण केल्याची तक्रार विशालने पोलिसात केली. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच सिनिअर विद्यार्थी त्याला खूप त्रास देत असल्याच त्याने सांगितलं. तसेच अश्लिल प्रश्न विचारणे खोलीत डांबून ठेवणे याच सोबत काही विद्यार्थांनी विशाल ला मारहाण केली. या प्रकरणी विशालने पोलिसात धाव घेतली. राज्यात रॅगिंला बंदी असली तरी अनेक कॉलेजमध्ये असले प्रकार बघालया मिळत आहेत. विशालने या आधी कॉलेजच्या प्राचार्यांकडे तक्रार केली होती. पण सिनियर विद्यार्थाना ताकिद देवून सोडून देण्यात आले पण तरी ही रॅगिगचा प्रकार थांबला नाही पोलीस मात्र या प्रकाराला रॅगिंग मानायला तयार नाहीत.

close