ए.राजांना धक्का, सचिवाने अडवले होते अर्ज

August 1, 2012 11:51 AM0 commentsViews: 3

01 ऑगस्ट

टू जी घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांना मोठा धक्का बसला आहे. दूरसंचार विभागातील माजी अधिकारी ए. के. श्रीवास्तव यांची आज कोर्टात साक्ष झाली. त्यात त्यांनी राजा यांचे खासगी सचिव आर. के. चंडोलिया यांच्यावर आरोप केला. 2 जी स्पेक्ट्रमसाठी युनिटेकच्या अर्जानंतर आणखी कुणाचेही अर्ज स्वीकारू नका, असे आदेश चंडोलिया यांनी दिल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं. राजा आणि चंडोलिया यांनी युनिटेकला नियमबाह्य मदत केल्याचा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता. श्रीवास्तव यांच्या साक्षीमुळे सीबीआयच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे.

close