तिरंदाज दीपिका ऑलिम्पिक बाहेर

August 1, 2012 12:19 PM0 commentsViews: 4

01 ऑगस्ट

भारताच्या मिशन ऑलिम्पिकला आज सर्वात मोठा धक्का बसला आहे. मेडलची सर्वाधिक अपेक्षा असलेल्या तिरंदाज दीपिका कुमारीला पराभवाला सामोरं जावं लागलंय. तिरंदाजीच्या वैयक्तिक प्रकारात दीपिकाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. वर्ल्ड नंबर वन असलेल्या दीपिका कुमारीची पहिल्या फेरीत गाठ होती ती इंग्लंडच्या ऑलिव्हर ऍमीशी. पण संपूर्ण मॅचमध्ये दीपिकाला सूरच सापडला नाही. ऑलिव्हरनं ही मॅच 6-2 अशी सहज जिंकली. दीपिका कुमारीच्या पराभवामुळे भारतीय तिरंदाजांचं लंडन ऑलिम्पिकमधलं आव्हान आता पूर्णपणे संपलंय.

close