परुपल्ली कश्यपची क्वार्टरफायनलमध्ये धडक

July 31, 2012 2:28 PM0 commentsViews: 7

31 जुलै

लंडन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या एकेरीत भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड सुरु आहे. काल सोमवारी सायना नेहवालने महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला आणि आज पुरुष एकेरीत परुपल्ली कश्यपने क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे. ग्रुप डी मधल्या आपल्या दुसर्‍या मॅचमध्ये त्याने व्हिएतनामच्या तियान मिनचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट कश्यपनं 21- 9 असा जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्ये व्हिएतनामच्या तियान मिननं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण कश्यपने त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. हा सेट कश्यपने 21-14 असा जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. ग्रुप डी मध्ये कश्यप सध्या अव्वल स्थानावर आहे.

close