अबू जुंदालला 14 दिवसांची पोलीस कोठडी

July 31, 2012 2:35 PM0 commentsViews: 3

31 जुलै

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपी अबू जुंदालला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. जुंदल प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. जुंदलने अनेक इ मेल आयडी ओपन केले आहे, त्याचे अनेक पासवर्ड आहेत आणि त्याचा तपास करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच कुबेर बोटीत सापडलेल्या वस्तूंची डिएनए चाचणी करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं.

close