पुण्यात दोन जणांमागे एक दुचाकी !

July 31, 2012 4:01 PM0 commentsViews: 2

31 जुलै

एकेकाळी सायकलींचं शहर प्रसिद्ध असलेलं पुणे आता दुचाकींचे आणि चारचाकी वाहनांचे शहर झाले आहे. पुणे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ही बाब समोर आलीय. पुणे महापालिकेतर्फे सर्वसाधारण सभेमध्ये पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार दर दोन जणांमागे एक दुचाकी आणि दर दहा जणांमागे एक चारचाकी वाहन असल्याचं स्पष्ट झालं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे ही वाढ होत असल्याचंही या अहवालात मान्य करण्यात आलं आहे. एकेकाळी शांत पेन्शनरांचं शहर अशी ओळख असणार्‍या ध्वनीप्रदूषणामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. या पर्यावरण अहवालाची प्रमुख वैशिष्ट्यं

- 2011 – 16 लाख 91 हजार 517 दुचाकी वाहनं- 2012 – 1 लाख 55 हजार दुचाकींची भर – चारचाकी गाड्या – 3 लाख 35 हजार 509 – दर दहा व्यक्तींमागे एक कार- रहिवासी,व्यावसायिक,शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनीपातळी मानांकनांपेक्षा जास्त- हवा प्रदूषणातही वाढ- मुळा-मुठा नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण- शहरातून चिमण्या गायब- कबुतरांची संख्या वाढली

close