टीम अण्णांच्या उपोषणावर पोलिसांचा वॉच

August 1, 2012 1:19 PM0 commentsViews: 3

01 ऑगस्ट

स्टेजवरून प्रक्षोभक भाषणं करू नका अशी सूचना देणारे पत्र दिल्ली पोलिसांनी टीम अण्णांना दिले आहे. शिवाय पहिल्या दिवसापासून उपोषणावर असणारे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि गोपाल राय यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करा अशी विनंतीही पोलिसांनी केलीय. दरम्यान, यापुढे दिल्ली पोलीस या आंदोलनावर बारकाईनं लक्ष ठेवून असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. उपोषणावर बसलेल्यांना उचलण्यासाठीही सरकार सज्ज असल्याचीही माहिती मिळतेय. मात्र, केजरीवाल यांनी हॉस्पिटलमध्ये भर्ती व्हायला नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'रामलीला'चा प्रयोग घडतो का ? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

close