लंकेचा धुव्वा, भारताने मालिका जिंकली

July 31, 2012 4:32 PM0 commentsViews: 4

31 जुलै

श्रीलंकेविरुध्दची चौथी वन डे मॅच जिंकत भारताने मालिका खिश्यात घातली आहे. 5 सामन्याच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत भारताने मालिका जिंकली आहे. विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारताने चौथ्या वन डेत श्रीलंकेवर 6 विकेटनं मात केली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी 252 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला गौतम गंभीर भोपळाही फोडू शकला नाही. तर वीरेंद्र सेहवाग 34 रन्स करुन आऊट झाला. रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तर मनोज तिवारी 21 रन्स करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैनानं जबरदस्त फटकेबाजी करत भारताला शानदार विजय मिळवून दिला. विराट कोहलीनं 128 रन्सची खेळी केली. वन डे करियरमधली ही त्याची 13वी सेंच्युरी ठरली. तर सुरेश रैनानं 58 रन्स करत त्याला चांगली साथ दिली.

close