वेळ पडली तर पद्मभूषण पुरस्कार परत करेन – अण्णा हजारे

July 31, 2012 4:59 PM0 commentsViews: 3

31 जुलै

लोकपाल विधेयकासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिलं वेळ पडली तर पद्मभूषण पुरस्कार परत देऊन टाकेल अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली. या अगोदरही अण्णांनी पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. आज टीम अण्णांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. तर अण्णांचा तिसरा दिवस आहे. अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. केजरीवाल यांचं ब्लडप्रेशर 73 पर्यंत खाली आलंय तर गोपाल राय यांचं 63 पण ब्लडप्रेशर कमी झालंय. डॉक्टर्सनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. पण केजरीवाल यांनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिलाय. दरम्यान, या आंदोलनाची दखल न घेण्याची भूमिका सरकारनं घेतलीय. त्यामुळे टीम टीम अण्णा आणि सरकारमधला संघर्ष वाढला आहे.

close