पुणे स्फोटातील जखमी सूत्रधार?

August 2, 2012 8:50 AM0 commentsViews: 2

02 ऑगस्ट

पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये जखमी झालेल्या दयानंद पाटील यांच्याभोवतीचं संशयाचं वातावरण आता वाढत चाललं आहे. दयानंद याच्या सायकलवरील कॅरियरमध्ये एक स्फोट झाला त्यात दयानंद जखमी झालाय. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पण चौकशी दयानंद विसंगत माहिती देत असल्यानं पोलिसांचा त्याच्याबद्दलचा संशय वाढला आहे. दरम्यान, पोलिसांनी दयानंदच्या पत्नीचीही चौकशी केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच याप्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटांसाठी ज्या तीन सायकलचा तपास करण्यात आला, त्या सायकल कुठून घेतल्या गेल्या याचा तपास करण्यासाठी कसबा पेठेतील सायकल मार्केटमध्ये पोलीस पोहोचले आहेत. या स्फोटांमध्ये हिरो कंपनीच्या 3 सायकल्स वापरल्या गेल्या. एफ 1 जी 05707, एलएफ-34582 एचजी-06373 या क्रमांकाच्या सायकल आहे. तिने विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे होते बंद

बॉम्बस्फोट झालेल्या 3 ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलेत..मात्र या फूटेजमधून काही संशयास्पद आढळलेलं नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देना बँक आणि मॅकडोमाल्ड या दोन स्फोट झालेल्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट नंतर उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी ठरल्याचं उघड झालं आहे.

close