महाराष्ट्रासाठी 500 कोटींचा दुष्काळनिधी जाहीर

July 31, 2012 5:08 PM0 commentsViews: 2

31 जुलै

महाराष्ट्रासह 12 राज्यांत दुष्काळाची परिस्थितीला सामोरं जाव लागतं आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी अनेक उपाय योजण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे. महाराष्ट्राला विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी 500 कोटींची मदत देण्यात येणार आहे. तर 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या जिल्ह्यांना डिझेल सबसिडी देण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही सबसिडी देणार आहे. तसेच शरद पवार आणि ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळाबाबत स्थापन करण्यात आलेला मंत्रीगट 1 ते 3 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटकच्या दौर्‍यावर येणार आहे. आणि दुष्काळग्रस्त राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

close