सरकार सुरक्षा पुरवण्यात अपयशी – खडसे

August 2, 2012 8:57 AM0 commentsViews: 8

02 ऑगस्ट

पुण्यात चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाले या बद्दल भाजपनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांनी आज घटनास्थळी भेट दिली. राज्य सरकार सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले अशी टीका विरोधकांनी यावेळी केली. यावेळी राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्हीची यंत्रणा ही राज्य सरकारने सांभाळावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. पुण्यात महापालिकेकडून सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. पण आर.आर. पाटील यांनी पुण्यात या अगोदर स्फोट होऊन सुध्दा सीसीटीव्ही लावण्याची घोषणा केली होती यासाठी मंत्रिगट लंडनला जाऊन आले होते पण सीसीटीव्ही आहेत कुठे असा संतप्त सवाल खडसेंनी उपस्थिती केला.

close