पुण्यात अण्णा समर्थकांचे आंदोलन एका दिवसासाठी स्थगित

August 2, 2012 9:03 AM0 commentsViews: 1

02 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात इंडिया अगेन्स्ट करप्शन संस्थेचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या ठिकाणाजवळ एक स्फोट झालाय. त्यामुळे पुणे पोलिसांनी जंगली महाराज रोडवरच्या आयएसी समर्थकांना आंदोलन रद्द करण्याची नोटीस दिली आहे. या ठिकाणीचं काल बॉम्बस्फोट झालेत, त्यामुळे पोलिसांनी ही नोटीस बजावलीय. आंदोलन बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असही पोलिसांनी या नोटीसमध्ये स्पष्ट केलंय. पोलिसांना सहकार्य म्हणून आजच्या दिवस आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पण उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाणार आहे.

close