दुष्काळी परिस्थितीबद्दल केंद्रीय पथकाची बैठक

August 1, 2012 9:50 AM0 commentsViews: 1

01 ऑगस्ट

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालचं केंद्रीय पथक मुंबईत आलंय. सध्या सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने यापूर्वीच 2 हजार 685 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. त्यात आता केंद्रानं पुन्हा 500 कोटींची तरतूद केली आहे. पण ही मदतही अपुरी असल्याचं राज्य सरकारला वाटतंय. तरी दुष्काळ निवारण्यासाठी आणखी 5 हजार 700 कोटी रुपयांची मागणी करण्याची शक्यता आहे.

close