माजी लष्करप्रमुखांची टीम अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती

August 2, 2012 9:07 AM0 commentsViews: 8

02 ऑगस्ट

टीम अण्णांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. तर अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. अरविंद केजरीवाल, गोपाल काय यांची प्रकृती स्थिर आहे. पण आता देशातील काही मान्यवर व्यक्तींनी टीम अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच टीम अण्णांनी आता संसदेत जाऊन संघर्ष केला पाहिजे असं आवाहनही केलंय. या मान्यवरांमध्ये माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग, व्ही.आर.कृष्णा अय्यर, माजी निवडणूक आयुक्त लिंगडोह, कुलदीप नायर आणि अभिनेते अनुपम खेर यांचा समावेश आहे. माजी नौदल प्रमुख तहलियानी यांनी जंतरमंतरवर जाऊन अण्णांना हे पत्र दिलं.

close