रायगडावरचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला

August 1, 2012 10:00 AM0 commentsViews: 14

01 ऑगस्ट

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडनं हटवला आहे. काल रातोरात हा पुतळा हटवण्यात आला आहे. या पुतळ्याचा इतिहासात उल्लेख नसल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा आहे. गेल्या दोन वर्षांपासून संभाजी ब्रिगेडने याबद्दल आंदोलन छेडले होते. मागिल वर्षी 6 जून रोजी पुतळा हटवण्याचा इशारा दिला होता. मात्र काही दिवसांनी तो मावळला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंची इतकीच वाघ्या कुत्र्याच्या समाधीची उंची आहे. वाघ्या कुत्रा हे पात्रच मुळी ऐतिहासिक नाही. राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' नाटकावरून ते उचलण्यात आलं आहे. त्याला कोणताही ऐतिहासिक अधिकार नाही असा दावा संभाजी ब्रिगेडने केला. दरम्यान, दरम्यान, संभाजी ब्रिगेडवर कारवाई करण्यात यावी आणि पुन्हा वाघ्याचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाजपक्षाचे महादेव जानकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे रायगड किल्ल्याचा ताबा पुरातत्व विभागाकडे आहे. तरी सुध्दा हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते.

close