पुणे स्फोटांप्रकरणी 6 जण ताब्यात

August 2, 2012 1:52 PM0 commentsViews: 4

02 ऑगस्ट

पुण्यात काल बुधवारी संध्याकाळी झालेल्या चार साखळी स्फोटांप्रकरणी 6 जणांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. या स्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील हासुद्धा यांच्यातीलच एक आहे. या सर्वांचा अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असण्याची शक्यता आहे अशी माहिती एटीएसचे पथक उद्या सकाळी 10 वाजता उघड करणार असल्याची माहिती आहे.

स्फोटांच्या अगोदर दयानंद पाटील हा जॉर्डनला जाऊन आल्याचं समजतंय. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केलाय. काल रात्री एटीएस प्रमुख राकेश मारीया यांनी दयानंद पाटील याची चौकशी केली. या चौकशीतून एटीएसला अनेक धागेदोरे मिळालेत. दयानंद याच्या सायकलवरील कॅरियरमध्ये एक स्फोट झाला त्यात दयानंद जखमी झालाय. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पण चौकशी दयानंद विसंगत माहिती देत असल्यानं पोलिसांचा त्याच्याबद्दलचा संशय वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी दयानंदच्या पत्नीचीही डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करत आहे.

close