नेमबाजी चुकली, रोंजन सोढी पराभूत

August 2, 2012 2:28 PM0 commentsViews: 33

02 जुलै

भारतीय नेमबाजी टीमला आणखी एक धक्का बसला आहे. मेन्स डबल ट्रॅप प्रकारात रोंजन सोढीला पराभवाचा धक्का बसला आहे. नेमबाजीत गगन नारंगनं ब्राँझ मेडल मिळवून दिलं. आणि याची पुनरावृत्ती रोंजन सोढी करणार अशी अपेक्षा भारतीय क्रीडाप्रेमी बाळगून होते. पण या अपेक्षांना धक्का बसलाय. रोंजनचं आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आलंय. पहिल्या दोन राऊंडमध्ये रोंजननं चांगली कामगिरी करत टॉप 6 मध्ये आपली जागा कायम ठेवली होती. पण तिसर्‍या राऊंडमध्ये त्याचा नेम चुकला आणि तो थेट 11 व्या स्थानावर घसरला. आता भारताच्या अपेक्षा आहेत त्या 25 मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये विजय कुमारकडून. पात्रता फेरीत विजय कुमारनं टॉप 8 मध्ये जागा पटकावली आहे.

विजेंद्र कुमार – जय भगवान नॉकआऊट पंच देण्यासाठी सज्ज

तर बॉक्सिंगमध्येही भारताची कामगिरी दमदार होतेय. बॉक्सिंगमध्ये 75 किलो वजनी गटात विजेंदर सिंग दुसर्‍या फेरीत खेळेल. त्याच्यासमोर आव्हान असेल अमेरिकेच्या गौशा टेरेलचं. तर 60 किलो वजनी गटात जय भगवानही आपली दुसरी मॅच खेळेल. कझाकिस्तानच्या गनीला नॉकआऊट पंच देण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

close