नेमबाजीत भारताचा ‘विजय’, सिल्व्हर पटकावले

August 3, 2012 2:33 PM0 commentsViews: 2

03 ऑगस्टलंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंगच्या नंतर भारताला आणखी एका सिल्व्हर मेडल मिळवून देण्याची धमकेदार कामगिरी विजयकुमारने बजावली आहे.भारताच्या खात्यात आणखी एका मेडलची नोंद झाली आहे. 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात नेमबाज विजय कुमारनं सिल्व्हर मेडल पटकावलंय. फायनलमध्ये विजय कुमारनं 30 पॉईंटची नोंद केली. क्युबाचा लॉरिस पुपोनं 34 पॉईंटची कमाई करत गोल्ड मेडल पटकावलं.विजय कुमारच्या विजयानं हिमाचलसरकारने त्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. याशिवाय हिमाचल गौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टला त्याला पुरस्कार देण्यात येणार आहे. विजय कुमार इंडियन आर्मीमध्ये कामाला आहे.

close