सायनाची क्वार्टर फायनलमध्ये धडक

August 2, 2012 2:38 PM0 commentsViews: 5

02 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची एकेरीत विजयी घोडदौड सुरु आहे. पी कश्यपबरोबरच सायना नेहवालनंही क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दुसर्‍या फेरीत सायनाने नेदरलँडच्या जी यावोचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट सायनाने 21-14 असा सहज जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्येही सायनाने जी यावोवर 21-16 अशी मात केली. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनची क्वार्टर फायनल गाठणारी सायना नेहवाल ही भारताची पहिली महिला बॅडमिंटपटू ठरली आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये सायनाची गाठ पडेल ती डेन्मार्कच्या बॉन टिनेशी. दरम्यान, बॅडमिंटनमध्ये क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा पी कश्यप सेमीफायनल गाठण्यासाठी प्रयत्न करेल.

close