बेनामी कंपन्यांमुळे भुजबळ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

August 3, 2012 3:28 PM0 commentsViews: 2

03 ऑगस्ट

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रँाग एनर्जी प्रयाव्हेट लिमिटेड कंपनीचे गैरव्यवहार थेट इंडोनेशिया आणि सिंगापूरपर्यंत पसरले असल्याचा आरोप भाजपचे सचिव किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये केलाय. नाशिकजवळच्या शिलापूरमधल्या आर्मस्टँागच्या एनर्जी प्लॅण्टची सोमय्या यांनी पाहणी केली. 4 वर्ष बंद असलेल्या या प्लँटसाठी भुजबळांनी इंडोनेशियामधून कोळशाच्या खाणी कशा खरेदी केल्या, 12 कोटी रुपयांचा तोटा दाखवणार्‍या कंपनीचे 100 रुपयांचे शेअर्स 10 हजार रुपयांना कसे विकले गेले या सार्‍या व्यवहाराची चौकशी कऱण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

close