फुलराणी सायना सेमीफायनलमध्ये

August 2, 2012 3:24 PM0 commentsViews: 15

02 ऑगस्टभारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इतिहास रचला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारी ती भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. क्वार्टर फायनलमध्ये सायना नेहवालनं डेन्मार्कच्या बॉन टिनेचा 21-15 आणि 22-20 असा पराभव केला. सायना नेहवालचा सध्याचा फॉर्म बघता लंडन ऑलिम्पिकमध्ये मेडलची ती प्रबळ दावेदार मानली जात आहे.

काल बुधवारी सायनाने पी कश्यपबरोबरच सायना नेहवालनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दुसर्‍या फेरीत सायनाने नेदरलँडच्या जी यावोचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट सायनाने 21-14 असा सहज जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्येही सायनाने जी यावोवर 21-16 अशी मात केली. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनची क्वार्टर फायनल गाठणारी सायना नेहवाल ही भारताची पहिली महिला बॅडमिंटपटू ठरली आहे. सायनाच्या दमदार विजयानंतर सायनाच्या हैदराबाद इथल्या घरी एकच जल्लोष साजरा झाला. सायनाचे वडील हरवीरसिंग नेहवाल या विजयामुळे आनंदित झाले होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावत सायना इतिहास रचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सायनाच्या या कामगिरीमुळे बॅडमिंटनप्रेमींचे लक्ष आता सेमीफायनलकडे लागले आहे.

close