पुणे स्फोटांप्रकरणी पोलिसांकडे पुरावेच नाही, दयानंद पाटील निर्दोष

August 3, 2012 3:34 PM0 commentsViews: 2

03 ऑगस्ट

पुणे स्फोटासंदर्भात अजून कोणताही ठोस पुरावा किंवा सुगावा मिळाला नसल्याचं पुणे पोलिसांनी कबूल केलं आहे. दयानंद पाटील हा प्रमुख संशयित नाहीय, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्याबरोबरच दयानंदची पत्नी आणि त्याच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्यांनाही सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण, दयानंदच्या चौकशीसाठी बिदरला एटीएसची टीम गेली. बिदर जवळच्या बसवकल्याण इथं त्याचं घर आणि शेती आहे. दयानंद 12 वर्ष मुंबईत होता. गेल्या दीड वर्षांपासून तो पुण्यात होता अशी माहिती त्याच्या आई-वडिलांनी दिली. दरम्यान, संशयितांविषयी माहिती घेण्यासाठी क्राईम विभागाच्या दोन टीम्सनी सायकल दुकानदारांकडे चौकशी केली. मात्र अजूनही संशयितांची रेखाचित्रं तयार झाली नाहीत. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच स्फोटाबद्दल ठोस माहिती मिळू शकते, असं पोलिसांनी सांगितलं.

close