मेधा पाटकर यांचे मंत्रालयातच ठिय्या आंदोलन

August 2, 2012 3:51 PM0 commentsViews: 6

02 ऑगस्ट

वाग मराठवाडी धरणाच्या प्रश्नावर मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांची राज्य सरकारबरोबर आज बैठक होती. या बैठकीला पतंगराव कदम आणि कृष्णा खोरेमंमत्री रामराज निंबाळकर हजर होते.आधी पुनवर्सन आणि नंतर धरण इतकचं आश्वासन सरकारनं दिलं. त्यातही सरकारनं कुठलाही आदेश काढायला नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पंतगराव कदम यांच्या दालनातचं ठिय्या आंदोलन सुरु केलंय. जोवर धरणाचं पाणी ताबतोब सोडणे, प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देणे आणि विस्थापीतांचं पुनर्वसन करणे याबाबतचे आदेश निघत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरुचं ठेवण्याच्या निर्धार मेधा पाटकरांनी व्यक्त केला आहे.

close