पुण्यात बॉम्बस्फोट करण्याचे मिळाले होते धमकी पत्र

August 3, 2012 3:42 PM0 commentsViews: 4

03 ऑगस्ट

पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आता धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी 15 ऑगस्टला बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येईल, अशी धमकी देणारं पत्र मिळालं होतं अशी माहिती आता समोर आली आहे. हे पत्र मगरपट्टा सिटीचे सेक्युरिटी ऑफिसर आर. डी. कांबळे यांना मागिल महिन्यात 12 जून रोजी मिळालं होतं.

हे पत्र मगरपट्टा सिटीतील एका दुकानासमोर पांढर्‍या लिफाफ्यात आढळले होते. या पत्रात 15 ऑगस्टला बॉम्बस्फोट घडवण्यासाठी काही अज्ञात अतिरेक्यांनी पुण्यातील गर्दीच्या ठिकाणाची पाहणी केली होती. त्यानुसार त्यांनी बॉम्ब ठेवण्याची जागा हेरुन ठेवली होती. कांबळे यांनी हे पत्र हडपसर पोलीस स्टेशनला दिलं होतं. हडपसर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय आर.जी. जाधव यांनी त्याची माहिती वरिष्ठांना दिली होती. एका गटाकडून हे स्फोट घडवण्यात येणार असून त्यांनी 10 जागांची पाहणी केली, असंही त्या पत्रात म्हटलंय. त्या सर्व जागांची माहितीही त्यांनी पत्रात दिली होती. त्यामुळे आपल्याला स्फोटाबाबत काहीच माहिती नव्हती या पुणे पोलिसांच्या दाव्याबाबत शंका निर्माण होत आहे.

close