ठाण्यात पेट्रोल,डिझेल होणार स्वस्त

August 2, 2012 4:00 PM0 commentsViews: 5

02 ऑगस्ट

ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी….ठाण्यात पेट्रोल,डिझेल,सीएनजीचे दर कमी होणार आहेत. ठाणे मनपाच्या जकात कमी करण्याचा ठरावाला आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली. त्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजी स्वस्त होणार आहे. जकात कमी झाल्यानं पेट्रोल तीन रुपयांनी, डिझेल 2 रुपयांनी सीएनजी, सीएनजी 1 रुपयानं कमी होणार आहे. फक्त ठाणे महापालिकेच्या हद्दीत हा निर्णय लागू होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे जिथे पेट्रोल,डिझेलच्या किंमतीत कपात होणार आहे. मागिल महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 80 पैशांनी कपात केल्यानंतर 60 पैशांने वाढ करण्यात आली होती. जकात कर कमी करण्याचा प्रयोग गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी अंमलात आणला आहे त्यामुळे तिथे सर्वाधिक कमी 55 रुपये लिटरने पेट्रोल उपलब्ध झाले आहे आता त्यापाठोपाठ ठाणे पालिकेनं पाऊलं उचलं आहे.