अण्णा हजारे काँग्रेसविरोधात नाही – खुर्शीद

August 3, 2012 6:04 PM0 commentsViews: 6

03 ऑगस्ट

अण्णा हजारे काँग्रेसविरोधी नाही. पण अलीकडेच अण्णांच्यासोबत आंदोलनात उतरलेले योगगुरु रामदेव बाबांचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे बाबा रामदेव आपला वापर करत आहेत असं अण्णा आणि आपली झालेल्या भेटीत बोलले होते असा गौप्यस्फोट केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी केला. तसेच अण्णांना किरण बेदी आणि संतोष हेगडे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी या भेटीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रशंसा केली होती. देशाच्या भल्यासाठी भेटीचा तपशील गुप्त ठेवणं चुकीचं नाही असंही अण्णा म्हणाले होते असा खुलासाही खुर्शीद यांनी केला. सलमान खुर्शीद यांनी अण्णा हजारे यांच्याशी 23 जून रोजी झालेल्या भेटीचा तपशील उघड केला आहे. त्यांनी तहलका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत भेटीबाबतची माहिती दिलीय.

close