टीम अण्णा आज संध्याकाळी उपोषण सोडणार

August 3, 2012 9:46 AM0 commentsViews: 1

03 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांची टीम आज संध्याकाळी 5 वाजता उपोषण सोडणार आहे. माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांच्या हातून आज अण्णा उपोषण सोडणार आहेत. केजरीवाल,सिसोदिया प्रवीण राय यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. तर अण्णांच्या उपोषणाचा 6 वा दिवस आहे. महत्वाचं म्हणजे राजकीय पर्याय देण्याची तयारीही टीम अण्णांनी दाखवलीय. त्यासाठी टीम अण्णांनी जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. अनेक प्रतिष्ठीत लोकांनी उपोषणाला राजकीय पर्याय देण्याची केलेली सूचना योग्यच असल्याचं काल अण्णांनी मान्य केलं. निवडणूक लढवणार नाही, पण बाहेरून पाठिंबा देऊ, असंही अण्णांनी सांगितलंय. राजकीय पर्याय द्यायचा असेल तर त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणं महत्त्वाचं आहे. सेवाभावी आणि देशभक्त उमेदवारांची निवड करायला हवी, असं अण्णा म्हणाले. उमेदवार कसे निवडावेत याच्या सूचना जनतेनं द्याव्यात, असं आवाहन टीम अण्णांनी केलंय.

close