विजयानंतरही विकास कृष्णन बाहेर

August 4, 2012 9:57 AM0 commentsViews: 5

04 ऑगस्ट

69 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर विकास कृष्णनचं आव्हान संपुष्टात आलंय. खरं तर काल रात्री झालेल्या या मॅचमध्ये विकासने 13-11 असा विजय मिळवला होता. पण या निकालावर अमेरिकेनं आक्षेप नोंदवला. आणि याची दखल घेत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं पंचांचा निर्णय बदलला. आणि विकासच्या अमेरिकन प्रतिस्पर्ध्याला 15-11 असं विजयी घोषित केलं. विकासने तिसर्‍या फेरीत केलेल्या चुकांमुळे आपण हा निर्णय बदलत असल्याचं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं म्हटलंय. पण आता याविरोधात भारतीय ऑलिम्पिक महासंघ आता तक्रार नोंदवण्याच्या विचारात आहे. आयओए IOA चे उपाध्यक्ष त्रिलोचन सिंग यांनी हा निर्णय चुकीचा आणि राजकीय असल्याचं म्हटलंय. ज्युरींनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपला निर्णय बदलल्याचं त्यांनी म्हटलंय. आता भारतीय अधिकारी लंडनमध्ये बैठक घेणार आहेत. आणि त्यानंतर या प्रकरणातील पुढची दिशा ठरवणार असल्याचं समजतंय.

close