पुणे स्फोटांप्रकरणी संशयितांचे रेखाचित्र आज जारी ?

August 3, 2012 9:57 AM0 commentsViews: 1

03 ऑगस्ट

पुण्यात बुधवारी संध्याकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातली संशयिताची रेखाचित्र आज जारी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेखाचित्र तयार आहेत. या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय आणि यातलाच एक म्हणजे दयानंद पाटील… या सर्वांचा अतिरेकी संघटनांशी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जातेय… विशेष म्हणजे दयानंद पाटील हा जॉर्डनला जाऊन आल्याची माहिती पुढे येतेय. याप्रकरणी दयानंद पाटीलसह त्याच्या पत्नीचीही चौकशी करण्यात येत आहे. तसेच या स्फोट वापरण्यात आलेल्या सायकली कोणी घेतल्यात याचा तपास पोलीस करत आहे.

close