‘दुष्काळात तेरावा महिना’, दुसर्‍या टप्यातही कमीच पाऊस पडणार

August 3, 2012 10:06 AM0 commentsViews: 6

03 ऑगस्ट

चार राज्यांमध्ये दुष्काळ पडला असताना आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे यंदा देशाच्या काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं सांगितलंय. मध्य कर्नाटकात अतिशय भीषण परिस्थिती असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, दुष्काळाबाबत स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटानं आज गुजरातच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या दुष्काळाबाबतच्या योजनांची माहिती द्यावी त्यानंतर दुष्काळी योजनांना अर्थपुरवठा केला जाईल अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली आहे.

close