काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक

August 4, 2012 10:23 AM0 commentsViews:

04 ऑगस्ट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाराजी नाट्यानंतर राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी बैठक होतेय या बैठकीला काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश तर राष्ट्रवादी कडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हजर राहणार आहेत. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त केली जाणार आहे. तर राष्ट्रवादींच्या मंत्र्यांकडून काँग्रेस आमदारांच्या कामाकडं दुर्लक्ष केल जात असा आक्षेप काँग्रेसकडून व्यक्त केला जाणार आहे. पण, समन्वय समितीत नाव नसल्यानं नारायण राणे, पतंगराव कदम नाराज छगन भुजबळ, आर. आर. पाटील नाराज आहेत.

close