पुणे स्फोट : ‘चोर सोडून सन्याशाला पकडले’

August 4, 2012 11:27 AM0 commentsViews: 3

04 ऑगस्ट

'चोर सोडून सन्याशाला पकडल्याचा' प्रकार पुणे बॉंबस्फोट प्रकरणात घडला आहे. संशयित म्हणून पकडलेला दयानंद पाटीलकडून चौकशीच्या अंती काहीच हाती लागले नाही. काल शुक्रवारी पोलिसांनीही दयानंद निष्पाप असल्याचे सांगितलं. त्यांनी चुकून स्फोटक ठेवलेली पिशवी उचलली आणि त्याचा स्फोट झाला होता.

पाटील हा मुळचा कर्नाटकचा आहे. बिदर जिल्ह्यातल्या कोहिनूर गावचा रहिवासी आहे. पंधरा वर्षापूर्वी त्याने गाव सोडलं. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उदरनिर्वाहासाठी तो गावातून बाहेर पडला होता. आजही त्याचं उर्वरीत कुटुंब कोहिनूर गावातच वास्तव्याला आहे. कोहिनूर गाव महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर वसलंय. कोहिनूर गावात पत्र्याच्या घरात दयानंद पाटीलचे आई वडील आणि भावाचं कुटुंब राहतं. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी त्याने गाव सोडलं. मुंबई गाठली , गेली तीन वर्ष तो पुण्यात वास्तवाला आहे. कपडे शिवण्याचा त्याचा व्यवसाय असल्याचं बोललं जात आहे. दयानंद पाटील याचं पुणे बॉंम्बस्फोटात संशयित म्हणून नाव आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. कोहिनूर गावातील दयानंदच्या घरी पुण्याचे एटीएस पथक तसेच इतर तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. कशाचीही कल्पना नसलेलं त्याचे कुटुंबीय या घटनेनं हादरुन गेलेत.

close