संजय दिना पाटील यांची मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड

August 6, 2012 8:40 AM0 commentsViews: 6

06 ऑगस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंुबई अध्यक्षपदी संजय दिना पाटील यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. अनेक महिन्यांपासून ही निवड प्रलंबित होती. खासदार संजय दिना पाटील आणि आमदार किरण पावसकर यांच्यात यापदासाठी रस्सीखेच सुरू होती. संजय पाटील यांच्या नावाला 35 पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी पसंती दिली. संजय दिना पाटील यांच्या नावाला सर्वाधिक मतं पडल्यांनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

close